तणाव निवळण्याच्या संकेतामुळे बाजार तेजीत

मुंबई – अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील शेअर बाजार चिंतेत होते. परंतु अमेरिका-इराणचा वाद न वाढवता शांततेचा संदेश दिला आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्‍स 323 अंकानी वधारुन 41,599.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 0.33 टक्‍क्‍यांनी वाढून निर्देशांक विक्रमी 12,311.20 वर बंद झाला आहे.

दिवसभरातील व्यवहारातील आज इन्फोसिसच्या समभाग सर्वाधिक म्हणजे 1.47 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविली. देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी सेवांमध्ये डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 23.7 टक्‍क्‍यांनी वाढून 4,466 कोटी रुपये झाला आहे. अमेरिका-इराणमधील तणाव थंडावल्याने आता तिमाही उत्पन्नाकडे आणि केंद्रीय अर्थसंकल्पात लक्ष लागले आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून उपाययोजनांची अपेक्षा केली जात आहे.

दरम्यान, शेअर बाजारात अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, कोटक बॅंक, एशियन पेंट्‌स आणि एचयूएल यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसरकीकडे आयसीआयसीआय बॅंक, इंडसइंड बॅंक, टायटन आणि भारती एअरटेल यांचे समभाग 1.11 टक्‍क्‍यांनी घसरले आहेत.

अर्थसंकल्पाकडे बाजाराची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 40 अर्थतज्ञांच्या सोबत गुरुवारी बैठक घेतली आहे. यामध्ये अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आधारीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात बाजाराचा कल तेजीकडे राहण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत. वाहन, बॅंकिंग, औद्योगिक, फायनान्स,ऊर्जा या क्षेत्रातील कंपन्यांमधील 2.83 तेजीत राहिले आहेत. तर आयटी क्षेत्रात घसरण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.