वाइनशॉप मालकासह मॅनेजरला कोयत्याच्या धाकाने लुटले…

पुणे(प्रतिनिधी) – दुचाकीवरून घरी निघालेल्या वाइनशॉपच्या मालकासह मॅनेजरला कोयत्याच्या धाकाने 5 जणांनी लुटले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सुहास दगडोबा निगडे (वय 42, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. यावेळी आरोपींनी दोघांच्या खिशातील रोकड व मोबाइल असा 70 हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास निगडे आणि त्यांच्या वाइनशॉपमधील मॅनेजर संदेश कुंभार हे दोघेजण दुचाकीवरून रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अप्पर डेपोच्या पाठीमागील रोडने घरी निघाले होते. दरम्यान, अत्तार सप्लायर बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर आले असता,पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर दोघांनाही कोयत्याचा धाक धाखवून निगडे यांच्या खिशातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल तर, मॅनेजरच्या खिशातील 50 हजारांची रोकड असा 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला. पुढील तपास गुन्हे निरीक्षक मुरलीधर खोकले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.