अग्निशमन सेवा पदकांसाठी शिफारस पाठविण्यास मुदतवाढ

पुणे(प्रतिनिधी) – अग्निशमन सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सेवा पदकांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस पाठवण्याचे सांगण्यात आले होते. त्यास 15 मेपर्यंत दिलेली मुदत वाढवून 30 जुनपर्यंत केली आहे. तर, याशिफारशी राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनालयाकडे पाठवण्याची अंतिम मुदत 31 मार्चऐवजी 5 जुन केली आहे. राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनालयाच्या वतीने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष प्राधिकरणांना याबाबतचा बदल कळवले आहेत.

अग्निशमन सेवेत कार्यरत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली जाते. अशा कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने विविध सेवा पदकाने गौरविले जाते. सेवेत कार्यरत असताना या पदकांचा कर्मचाऱ्यांना फायदा होत असतो. त्याकरिता बजावलेल्या कामगिरीचा सन्मान व्हावा, याकरिता अशा कर्मचाऱ्यांची शिफारस पदकांसाठी करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात आली होती.

येत्या स्वातंत्र्यदिनी या पदकांनी कर्मचाऱ्यांना गौरविण्याचे नियोजन आहे. 31 मार्चपर्यंत या शिफारशी राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनालयाकडे पाठविण्याची मुदत होती. तर राज्याकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला 15 मेपर्यंत या शिफारशी पाठविण्याची मु दत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.