कैद्याचा पलायनाचा प्रयत्न; येरवडा तात्पुरत्या कारागृहातील प्रकार

पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातून कैद्याने पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळासाहेब गोविंद कांबळे (वय 50) असे कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी कांबळेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई भगवान पालवे (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. कैद्यांमध्ये करोना संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने शहरात तात्पुरत्या स्वरुपाची कारागृहे तयार केली आहेत. त्यानुसार कांबळे याला प्रेस कॉलनीसमोरील शासकीय वसतिगृहात तयार केलेल्या तात्पुत्या कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, रविवारी सायंकाळी त्याने कारागृहातील खोली क्रमांक तीनचा प्लायवूडचा दरवाजा हिसका देऊन उघडला. त्यानंतर खोलीतून बाहेर पडून लोखंडी रेलिंगला धरून खाली उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावर असेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.