पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची भाजपवर सडकून टीका

पुणे : पवार कुटुंबीयांच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. यावरून माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बोलत होते. मुळात ते पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू, असल्याची टीका शरद पवार यांनी केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही. दोन दिवस पाहुणे ठिक असतात पण आठ दिवस पाहुणे राहायला लागले तर वैताग येतो. अधिकाऱ्यांना वरून फोन यायचा. त्यानंतर ते मुक्काम वाढवायचे, असा धक्कादायक खुलासा पवार यांनी केला.

पुन्हा पुन्हा मी येणारच असं सांगत होते. पण त्यांचं काही जमेना. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून राजकीय आकसाने या चौकशा सुरू झाल्याची टीका पवारांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.