Bank open on 31 March| जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असेल तर, रविवारी 31 मार्च रोजी देखील तुम्हाला करता येणार आहे. रविवार असला तरी या दिवशीही देशातील बँकांच्या शाखा सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 31 मार्च रोजी सरकारी कामांसाठी शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.
31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्याने बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळे 31 मार्चला बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 31 मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.
31 मार्च रोजी बँक सुरू ठेवण्याचे RBIचे निर्देश Bank open on 31 March|
RBI ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “भारत सरकारने 31 मार्च 2024 (रविवार) रोजी सरकारी पावत्या आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे. जेणेकरून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पावत्या आणि देयके मिळतील. संबंधित सर्व सरकारी व्यवहारांची खाती ठेवता येतील.” त्याचप्रमाणे, एजन्सी बँकांनाही 31 मार्च 2024 रोजी सरकारी व्यवसायाशी संबंधित त्यांच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी आयकर विभागाने वीकेंडच्या लाँग सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. म्हणजेच शुक्रवार 29 मार्च ते 31 मार्चपर्यंत विभागाची सर्व कार्यालये सुरू राहणार आहेत. यासंदर्भात आयकर विभागाने परिपत्रकही जारी केले आहे. यावेळी 29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडे आहे. 30 मार्चला शनिवार आणि 31 मार्चला रविवार आहे. दुसरीकडे, 31 मार्च 2024 हा चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आयकर विभागाने लाँग वीकेंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
‘सोन्या – चांदीच्या दरात वाढ सुरूच, इतक्या रुपयांनी झाले ‘महाग’; पाहा आजचे दर काय