लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वजण आपल्या घरातच आराम करत आहेत. मालिकांचे चित्रिकरणही बंद असल्याने सर्व कलाकारदेखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. या सुट्टीमध्ये कलाकारांना त्यांची आवड-निवड जोपासण्यासाठी वेळ मिळाला आहे. हे कलाकार घरी त्यांचा वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
शनाया म्हणून “माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ईशा केसकरसाठी लॉकडाउनचा हा काळ म्हाऊनच्या काळात मी एक गोष्ट आवर्जून करते आहे ते म्हणजे कोणालाही कणजे थोडीशी हवीहवीशी वाटणारी सुट्टी आहे. एरवी मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र असल्यामुळे ज्या-ज्या गोष्टी करता येत नाही त्या सगळ्या या सुट्टीत करून पाहायच्या आणि छोट्या-छोट्या गोष्टीतला भरभरून आनंद घेत पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागण्याची ऊर्जा यातून घ्यायची, असे ईशा म्हणाली.
लॉकडाऊनमध्ये ईशा कसा वेळ घालवते हे विचारल्यावर ती म्हणाली, लॉकडोणती अडचण आली तर मला जितकी मदत करता येईल तेवढी मी करते. चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनाही मी हे सांगते. उरलेल्या वेळात अगदी कमीत कमी आणि हाताशी असलेल्या वस्तूंमधून मला काय करता येईल ते प्रयत्न करते. माझ्या दोन मांजरी आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्यात माझा खूप छान वेळ जातो. सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे, असे तिने सांगितले.