पुणे(प्रतिनिधी) – पुणे ते वाशिम असा पायी प्रवास करणाऱ्या 22 मजूर कामगारांना आज पुणे येथून वाशिम येथे आपल्या मूळ गावी ट्रॅव्हल्स मधून रवाना करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, आज (दि 10 मे) रोजी पुणे ते वाशिम असा पायी प्रवास करणारे 22 मजूर कामगार वाशिम येथे आपल्या मूळ गावी पायी जात होते. त्याचवेळी त्यांना थांबवत सर्व मजूर कामगारांना त्यांच्या मूळ गावी वाशीम येथे रवाना करण्यात आले. या कामी पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग सुधाकर यादव तसेच शिवाजी नगर पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सहकार्य व प्रयत्न केले.
तसेच रवाना होण्याच्या वेळी सदर मजुरांना मास्क, सॅनीटायजर, पाणी बॉटल. रात्रीचे व इतर आवश्यक ते सर्व वस्तूंची पूर्तता करून एका खाजगी ट्रॅव्हल्स मधून मूळ गावी वाशीम येथे सांयकाळी 6 वाजता रवाना करण्यात आले.