10 मे हा “मदर्स डे’ असून इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे शिल्पा शेट्टीनेही तिची बहीण शमितासाठी आईचे महत्त्व काय आहे, हे सांगितले. मातृत्व, सन्मान, नैतिकता आणि प्रेम याचे एक विलक्षण उदाहरण म्हणजे आई, असे शिल्पा म्हणाली.
शिल्पाने सांगितले की, मी देवाची खूप-खूप आभारी आहे, ज्याने या जन्मात मला अशी आई दिली. आईने मला निर्मल आणि निःस्वार्थ प्रेम दिले. ती शमिता आणि माझ्यासाठी शक्ती, सन्मान, नैतिकता आणि प्रेमाची एक विलक्षण अशी मूर्ती आहे.
“तिने आम्हाला एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी मदत केली, ज्यामुळे आम्ही आज ही प्रगती करू शकलो. तिने सुरुवातीच्या काळात आम्हाला जी नैतिक आणि आध्यात्मिक शिकवण दिली, ती खूप सुंदर भेट आहे. ज्याचे मोल आम्ही आयुष्यात कधीही फेडू शकत नाही.
शिल्पाने टिकटॉक ऍपवर “थॅक्स मॉ’च्या हॅशटॅग माध्यमातून तिच्या आईचे आभार मानले आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने टिकटॉकचे टेम्पलेट वापरुन तिच्या आईबद्द प्रेम व्यक्त केले आहे. तसेच शिल्पाने तिच्या सासूचेही आभार मानले आहेत, ज्यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले. शिल्पा म्हणाली, आपल्या प्रेम आणि आशीर्वादांशिवाय हे अजिबात शक्य झाले नसते.