मुंबई – अभिषेक बच्चन आणि आर बाल्की बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे. एका आगळ्यावेगळ्या कथानकासोबत ही जोडी दिसणार आहे. ही कथा एका महिला क्रिकेटरचा प्रवास उलगडणार असल्याचे समजते. त्याचा हटके टीजर देखील समोर आला आहे.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘घूमर’चा टीझर प्रदर्शित झाला. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे तर सैयामी खेर प्रमुख खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे. ‘घूमर’ ही पॅराप्लेजिक खेळाडूची प्रेरणादायी कथा आहे. या चित्रपटाचा टीझर जबरदस्त आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
चित्रपटाच्या टीझरमधील अभिषेक बच्चनचा लूक खूपच प्रभावी आहे. तर सैयामी एक हात नसलेल्या महिला क्रिकेटरची भूमिका साकारत आहे.टीझरची सुरुवात एका दमदार डायलॉगने होते. यावरून चित्रपट खूप प्रेरणादायी असल्याचे समजते. अभिषेक बच्चनने हा टीझर त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे,”लेफ्टी है ? लेफ्ट ही है !
या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्याशिवाय शबाना आझमी देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका खास भूमिकेत दिसणार आहेत. ‘घूमर’ हा चित्रपट क्रिकेटभोवती फिरत असून यात बिग बी समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. याआधी अमिताभ आर बाल्की यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘घूमर’ चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, तो 3 दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. ज्याची घोषणा या टीझरसोबत करण्यात आली आहे.