मुंबई – बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या लेटेस्ट स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र नुकतंच तिच्या एअरपोर्ट लूकने चाहत्यांना नाराज केले आहे आणि फॅन्सने तिच्या फॅशन सेन्सला डिझास्टर म्हटले आहे. ऐश्वर्या शनिवारी सकाळी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. हे तिघेही सुट्टीचा आनंद घेऊन भारतात परतल्याने समजते. मात्र चाहत्यांना ऐश्वर्याचा यावेळेसचा लूक रुचला नसल्याचे समजते.
यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस आणि लाल घड्याळ घातलेले दिसले. अभिनेत्रीने यावेळी आपले केस मोकळे ठेवले होते.अभिषेकने राखाडी रंगाचा टी,शर्ट निळी जीन्स, काळी टोपी, पांढरे स्नीकर्स आणि लाल फ्रेमचा चष्मा घातला होता. तर, आराध्याने लैव्हेंडर रंगाचा स्वेटशर्ट, निळा डेनिम आणि ब्लिंगी हेअर-बँड घातला होता. जेव्हा ते विमानतळाबाहेर आले तेव्हा पापाराझींनी त्यांचे स्वागत करत फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली.
चाहत्यांना ऐश्वर्याचा हा लूक आजिबात आवडलेला दिसत नाही. यावेळेसचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यावर अनेकजण कमेंट करून तिची तुलना पाकिस्तानी महिला सिंगरशी करत आहेत. ‘लग्नानंतर तिचा ड्रेसिंग सेन्स बिघडला आहे’ अशी कमेंट एका चाहत्याने यावेळी केली आहे. तर दुसऱ्या एकाने ऐशचा हा लूक आबिदा परवीरपासून प्रेरित आहे असं म्हंटल आहे.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांमध्ये ऐश्वर्या सिनेसृष्टीपासून दूर होती आणि कुटुंबाला वेळ देत होती. मात्र या काळात तिने काही निवडक चित्रपटाचं केले जे चांगलेच सुपरहिट ठरले. ज्यामध्ये रोबो सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ऐश्वर्या शेवटची ‘पोनियिन सेल्वन 2’ मध्ये दिसली होती ज्यामध्ये तिने ऐतिहासिक भूमिका साकारली होती.