अगदी ‘त्या’ युझरच्या सल्ल्याप्रमाणे झाला हैद्राबाद एन्काऊंटर

नवी दिल्ली – हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिसांनी या एन्काऊंटरला दुजोरा दिला आहे.

सर्व आरोपींना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी दुष्कर्म केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी चारही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले. यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच सोशल मीडियावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना काही दिवसांपूर्वीच एका युझरने दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच एन्काउंटर घटनाक्रम घडल्याची चर्चा आहे. या सल्ल्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटला रिट्विट करत त्या युझरने म्हंटले कि, आरोपींना घटनास्थळी नेऊन तेथे काय झाले हे याचा जाब त्यांना विचारा. त्यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि तेव्हाच त्यांना गोळ्या घाला असा सल्ला दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.