बायको खर्रा खाते म्हणून पतीने उचललं टोकाचं पाऊल; तरी पदरी निराशा

नागपूर – पुरुषांच्या व्यसनांमुळे त्यांच्या पत्नी आणि नातलग त्रस्त असतात. अशा बातम्या येत असतात. आता मात्र नवीनच वृत्त समोर आले असून पत्नीच्या व्यसनाला नवऱ्याने थेट कोर्टाची पायरी चढली. मात्र त्याच्या पदरी न्यायालयाकडून देखील निराशा आली आहे.

नागपूरमध्ये शंकर आणि रिना यांचे 2003 साली लग्न झाले होते. पण लग्नानंतर दोघांमध्ये आलबेल नव्हते. रिना सतत माहेरी जाते, घरातील कामं करत नाही. तसेच रिनाला खर्रा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे रिनावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हा खर्च आपल्याला परवडणारा नसल्याचे शंकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत म्हटले आहे.

खर्रा खाणं ही वाईट आणि गंभीर गोष्ट आहे. पण ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे. तसेच इतर कारणं सामान्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.  यापूर्वी पती शंकरने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे अखेर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.