लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाराबंकीत आजचा सोमवार घातवार ठरला आहे. कारण आज सकाळी दोन खासगी बसमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत आठ प्रवासी जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १२ लोकं गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
पूर्वांचल एक्सप्रेस-वे पर सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद है।
संबंधित अधिकारियों को राहत व बचाव कार्य तेजी से संचालित करने और घायलों के समुचित उपचार हेतु निर्देश दिए गए हैं।
प्रभु श्री राम दिवंगत आत्माओं को शांति तथा घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) July 25, 2022
आज पहाटे पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. बिहारहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या दोन डबल डेकर खासगी बस एकमेकांना धडकल्या. एका भरधाव बसने मागून दुसऱ्या बसला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली. तसंच जखमींनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे.
अपघातातील गंभीर जखमींना सीएचसी हैदरगडहून लखनौ ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आलं आहे. तर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बसला हायवेवरुन हलवण्यात आलं आहे. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. या अपघातामुळे हायवेवरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, आता बस महामार्गीवरुन हटवण्यात आल्यामुळे वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.