मुंबई – अभिनेता विकी कौशल आणि पत्नी कॅटरिना कैफला अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने सिने सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. विकी आणि कॅटरिना ही जोडी संपूर्ण बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच दोघेही विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर आता दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समजते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी आणि त्याच्या पत्नीला धमकी देण्यात आल्याचे समजते. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ खबरदारी म्हणून पोलिसांत यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात धमकी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफची याबाबत अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही.
Maharashtra | Police register a case against an unidentified man and initiate an investigation for allegedly giving life threats to actors Katrina Kaif and Vicky Kaushal through social media. Case registered at Santacruz Police Station: Mumbai Police
(File photos) pic.twitter.com/hQTaTMnB9a
— ANI (@ANI) July 25, 2022
सलमान खानला देखील आली होती धमकी
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना देखील धमकीचे पात्र आले होते. त्यानंतर सलमान खानाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी शस्त्र बाळगण्यासाठी परवानगी मागितल्याचे वृत्त देखील समोर आले होते.