सातारा – सांगली येथे झालेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलीस दलाने 15 पदके मिळवत परिक्षेत्रात अव्वल कामगिरी बजावून उपविजेतेपद पटकाविले आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाने पाच सुवर्ण, पाच रजत आणि पाच कांस्य पदकांसह 110 गुण मिळवले. परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांना हणमंत भोसले, अतुल जाधव, अमोल गवळी या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यातील सुवर्ण पदक विजेत्यांचे मार्गदर्शन लाभले होते.
परिक्षेत्रीय पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याच्या धर्तीवर राज्य व परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन होते. यामध्ये विज्ञान शास्त्राची तपासात मदत, घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, श्वान स्पर्धा या विभागामध्ये स्पर्धा घेतली जाते.
या मेळाव्यात पोलीस ऑब्झर्वेशन टेस्ट – संग्राम फडतरे (कराड तालुका),पोलीस पोट्रेट टेस्टमध्ये संग्राम फडतरे (कराड तालुका) विक्रांत फडतरे (सायबर पोलीस ठाणे), चेक ऍक्सेस कंट्रोल व ग्रांउड स्पर्धा- अमोल निकम, संतोष पांडव (बीडीडीएस, सातारा) पोलीस व्हिडीओग्राफी- व्ही.एच.मोरे (मेढा पोलीस ठाणे) फोटोग्राफी स्पर्धा- पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षीत (दहिवडी पोलीस ठाणे) संगणक लेखी व स्पर्धा – विक्रांत फडतरे (सायबर पोलीस ठाणे) फिंगरप्रिंट स्पर्धा – उपनिरीक्षक प्रमोद देसाई (दहिवडी पोलीस ठाणे) बॉम्ब शोधक श्वान – रुद्रा या श्वानाचे हॅंडलर म्हणून आक्रम मेटकरी, ट्रॅंकर श्वान- वीर व त्याचे हॅंडलर म्हणून सचिन भोसले, सुरज नडे, नार्कोटीक्स श्वान – सुचक व त्याचे हॅंडलर म्हणून दत्तात्रय चव्हाण यांना गौरविण्यात आले. सर्व यशस्वी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विषेश पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त अधीक्षक धीरज पाटील, उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अभिनंदन केले.