इस्लामाबाद – पुढील वर्षी जानेवारीपासून पाकिस्तानमध्ये गॅसचा तुटवडा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. “सुई नॉर्थर्न गॅस पाइपलाईन लिमिटेड’ अर्थात “एसएनजीपीएल’ला दरदिवसाला 500 एमएमसीएफडी (दररोज दशलक्ष घनफूट) इतकी घट होणार आहे.
यामुळे उर्जा प्रकल्पांना केला जाणारा “रिगॅसिफाईड लिग्युफाईड नॅचरल गॅस’चा पुरवठा थांबवण्याची नामुष्की सरकारसमोर येण्याची शक्यता आहे. नायजेरीयाकडून होणाऱ्या “एलएनजी’चा पुरवठा होण्यास विलंब झाल्यामुळे “सुई नॉर्थर्न गॅस पाईपलाइन लिमिटेड’ 200 “एमएमसीएफडी’एवढाही गॅस उपलब्ध करून देऊ शकणार नाही.
परिणामी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील गॅसच्या पुरवठ्यासमोर गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. गॅस उपलब्ध न होण्यामुळे कराची आणि क्वेट्टा येथील गॅस पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
“सुई नॉर्थर्न गॅस पाईपलाइन लिमिटेड’ने यापूर्वीच कमी उत्पादन क्षमता असलेल्या औद्योगिक केंद्रांना होणारा गॅसचा पुरवठा यापूर्वीच थांबवला आहे. “सीएनजी’ आणि खतांच्या उत्पादक कंपन्यांना केला जाणारा गॅस पुरवठाही थांबवला गेला आहे.
गॅस पुरवठ्यात ही कपात केल्यावर उपलब्ध होणारा 250 एमएमसीएफडी गॅस घरगुती वापरासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र तरिही घरगुती वापरासाठीही हा गॅस पुरेस नाही. आताच गॅस उपलब्ध होत नसल्याने काही शहरांमध्ये नगरिकांनी जळाऊ लाकडाचा आणि कोळशाचा वापर स्वयंपाकासाठी करायला सुरुवात केली आहे.