लष्करी वाहन दरीत कोसळून भीषण अपघात; तीन जवानांसह एका मुलाचा मृत्यू

सिक्‍कीम – सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात लष्करी अधिकाऱ्याच्या 13 वर्षीय मुलासह तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.

रविवार (20 डिसेंबर) रोजी येथील नाथुलाजवळ 17 व्या मैलावर लष्कराचे एक वाहन जवाहरलाल नेहरू मार्गावरून खाली घसरून दरीत कोसळल्याने हा अपघात घडला.

याबाबत पूर्व सिक्कीमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) एसई येलसरी यांनी माहिती दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तीन जवान व लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

बर्फाच्छादित रस्ते असल्याने वाहन मार्गावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर, गाडी दरीत कोसळल्यानंतर गाडीचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.