पुणे – शहरातील किमान तापमानात दोन अंशाने घट झाल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढल्याचे दिसून येते. रविवारी (दि. 21) शहरातील किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील, सकाळी धुके पडेल तर किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
दक्षिण कर्नाटक ते मध छत्तीसहगडपर्यंत असलेली द्रोणीका रेषा आज पूर्व विदर्भापर्यंत आहे. तसेच हवेतील वरील स्थरातील चक्रीय स्थितीमुळे राज्यात आद्रता वाढली आहे. त्याचा परिणाम विदर्भ आणि मराठवाडा परिसरात होणार आहे. पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात हलका ते अति हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. आकाश निरभ्र राहील तर धुक्याचे प्रमाण वाढेल.