नवी दिल्ली – छत्तीसगड सरकारमध्ये टीएस सिंहदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधकांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसही भाजपच्या टीकेवर सडेतोड उत्तर देतांना दिसत आहे. अशात महाराष्ट्रात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव राज्यातील सत्तासंघर्षवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
सीएम एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव म्हणाले की, शिंदे – फडणवीस सरकारचे इंजिन कमकुवत होते, त्यामुळे आता 3 इंजिन सरकार झाले आहे. आम्ही छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सहाय्यक प्रशिक्षकांप्रमाणे काम करत आहोत. इंजिनमध्ये कदाचित काही कमकुवतपणा आहे ज्यामुळे त्यांना (भाजप) गरज आहे.’
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हे’ ट्रीपल इंजिन सरकार राज्याच्या जलद गतीने विकास करेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती. ते पुढे म्हणाले होते की,’आम्ही एकत्र राज्याच्या विकास करू आणि हे सरकारला जनतेच्या विकासावर काम करण्यास तत्पर राहील. असेही शिंदे म्हणाले होते. आता काँग्रेसकडून शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे.