पिंपरी, (प्रतिनिधी) – लग्नसराईमुळे वाहतूक कोंडीत सापडण्याचा अनुभव आळंदीकरांना नवीन नाही. मात्र, आज आळंदीत एकही लग्न नसताना वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचा मोठा फटका नागरिक व प्रवाशांना बसला. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 90 मीटर रस्त्यावर सहा किलोींटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची अभूतपूर्व वाहतूक कोंडी पहायला मिळाली.
त्यामुळे घरी परतणारे चाकरमाने, विद्यार्थी व प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक शाखेचे कर्मचारी अनुपस्थित असल्याने ही कोंडी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.
लग्नपंढरी अशी आळंदीची राज्यभर ख्याती आहे. लग्नसराईची तिथी म्हणजे हमखास वाहतूक कोंडी असे समीकरणच बनले आहे. त्यामुळे लग्नतिथीच्यादिवशी आळंदीकर घराबाहेर पडणे शक्यतो टाळतात. तर चाकरमानेदेखील सकाळी वाहतूककोंडी सुरू होण्यापुर्वीच कामाल रवाना होतात. तर रात्री आठवाजेपर्यंत बर्यापैकी वातावरण निवळलेले असते.मात्र. आजची परिस्थिती नेमकी विरुद्ध पहायला मिळाली. दिवसभरात आळंदीत एकही लग्नसोहळा नसल्याचे चित्र होते.
मात्र, सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून पुणे-आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. पुणे -आळंदी रस्त्त्यावर पालखी महामार्गावर आळंदीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बालाजी मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे रात्री पहायला मिळाले. दीड तासापेक्षा अधिक काळ गाडीतच बसून रहायला लागल्याने बस व खासगी वाहनांमधील प्रवासी चांगलेच वैतागले होते. त्यातच उकाड्याने त्यामध्ये भर पडली होती.
वाहतूक शाखेचे कर्मचारी गाय
वाहतूक कोंडी झाल्यानंतर नागरिकानी वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांचा शोध घतेला.ममात्र. हे कर्मचारी नसल्याचे पहायला मिळाले. तर वाहतूक शाखेच्या दोन महिला कर्मचारी रस्त्याच्या बाजूला उभ्या राहून वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची गंमत पाहत होत्या, अशी प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली. याबाबत दिघी-आळंदी वाहतूक शाखेच्या अधिखार्यांशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
स्थानिक तरुणांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पालखी महामार्ग 90 मीटर रुंद असून, त्यामध्ये बीआरटी मार्ग, मुख्यरस्ता व सेवा रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, या सर्वच रस्त्यांवर वाहने थांबून राहिल्याने नेमके अघटीत काय घडले आहे? असा प्रश्न स्थानिक तरुणांना पडला. त्यामुळे हे तरुण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरसावले. रात्री उशिरापर्यंत हे तरुण वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशीलअ सल्याचे चित्र पहायला मिळाले.