तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद मालमत्ता करांच्या वसुलीसाठी कडक उपाययोजना करणार आीक. यावर्षी १०० टक्के कर वसुली करण्यासाठी कर संकलन विभाग कामाला लागला आहे.
तळेगाव शहरात ३७ हजार ७५६ मालमत्ताची नोंदणी नगरपरिषदेकडे झालेली आहे. मालमत्ता करापोटी ३२ कोटी 95 ९५ लाख ६० हजार रूपये वसुली करावयाची आहे. त्यापैकी आतापर्यंत १० कोटी ३८ लाख ३७ हजार रूपयांची वसुली झाली आहे. शहरातील सर्व मिळकतदारांना त्यांच्या वसुलीच्या घरपट्टया पाठविलेल्या आहेत. सर्वांनी ३१ मार्चपुर्वी आपला मालमत्ता कर पुर्ण भरावा, असे आवाहन केले आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. मोठी थकबाकी असलेल्या मिळकतदारांकडील वसुलीसाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.
शहरातील वसुलीसाठी नगरपरिषदेने एकुण बारा विभाग केलेले आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारीवर्ग वसुलीसाठी घरोघरी जात आहेत. याशिवाय शहरातील सुमारे १५ हजार नळजोड असुन पाणीपट्टी वसुलीसाठीही कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील नळजोड धारकाकडुन ९ कोटी ४ लाख रुपये एकूण वसुली करावयाची आहे. आतापर्यंत २ कोटी ५२ लाख रूपये वसुली झाली आहे. नगरपरिषदेची ५० हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या करदात्यांच्या नावांची यादी मध्यवर्ती चौकात प्रसिद्ध केली जाणार आहे.
नगरपरिषदेच्या कर अधिकारी कल्याणी लाडे, करनिरीक्षक विजय शहाणे, मिळकतकर व्यवस्थापक जयंत मदने यांच्यासह सर्व कर वसुली अधिकारी वसुली करण्यासाठी रोज धावपळ करीत आहेत.