अपहरण करून व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

कामशेत – येथील एका कपड्याच्या व्यापाऱ्याला अपहरणप्रकरणी कामशेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धनाजी शिवाजी जाधव (वय 29, रा. विठ्ठलवाडी, पौड, ता. मुळशी) आणि नंदू मुकुंद भोईने (वय 38) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती शेळके (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या महिलेने 29 मार्चला दुपारी बारा वाजता तळेगाव बस स्थानकावर फोन करून व्यापाऱ्याला बोलविले होते. व्यापाऱ्याशी भेट झाल्यानंतर शरीरसंबंधाचे आमिष दाखविले. महिलेने व्यापाऱ्यास वडगाव येथील एका लॉजवर घेऊन गेली.

शरीरसंबंध झाल्यानंतर पैसे उकळण्याच्या बहाण्याने स्वाती शेळके आणि अन्य पाच अज्ञात इसमांनी व्यापाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर डांबून त्याचे अपहरण केले. त्यास अज्ञातस्थळी नेऊन बांबूने जबर मारहाण केली. तसेच व्यापाऱ्याकडून 25 लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर व्यापाऱ्याच्या बॅंक खात्यातून मोबाइल बॅंकिंगच्या माध्यमातून 96 हजार रुपये काढले. दोन आरोपींनी त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर घेतले. याप्रकरणी व्यापाऱ्याने कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी कोणत्या बॅंकेत खात्यात पैसे ट्रान्स्फर करून घेतले आहेत. त्यावरून आरोपींची माहिती घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, पोलीस हवालदार संतोष घोलप, महेश दौंडकर, समीर शेख व बाळकृष्ण भोईर यांनी गुरुवारी (दि. 4) पहाटे पौड येथून पाच अज्ञात आरोपींपैकी धनाजी जाधव आणि नंदू भोईने यांना ताब्यात घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.