…आणि ईशा सापडली!

“मी तुमच्यासारखा दिसतो’ त्यामुळे तुमच्यावर बायोपिक करायचे असे बोलले जात आहे. असे सुबोध भावे म्हणताच, राहुल गांधी यांनी “तुम्ही माझ्यासारखे नाही, मीच तुमच्यासारखा दिसतो’ असे मिश्‍कील उत्तर दिले. त्यावेळी सुबोधने राहुल यांच्या उत्तराला दाद देत, “मी तुमच्यावर बायोपिक करतो, तुम्ही माझ्यावर बायोपिक करा’ असे म्हणतात विद्यार्थ्यांनी जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला.

“ईशा’ हे नाव घेताना थोडे छान वाटते, पण ती आहे कुठे? असे प्रेमाने म्हणताच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात तरुणांनी जल्लोष केला. क्षणभर हा जल्लोष कशासाठी झाला हे राहुल यांनाही कळले नाही, परंतु व्यासपीठावर सूत्रसंचालक म्हणून सुबोध भावे आहेत आणि ईशा नाव ऐकल्यावर गालावर “खळी’ पडणारच. मात्र, ही टीव्ही मालिकामधील “ईशा’ नव्हती तर राहुल गांधी यांचे विचार ऐकण्यासाठी आलेली तरुणी होती.

मगरपट्टा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यावेळी राहुल यांना प्रश्‍न विचारण्यासाठी विद्यार्थी उत्स्फूर्त होते. परंतु आयोजकांकडून काही निवडक प्रश्‍न घेण्यात आले. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा प्रश्‍न निवडण्यात आला, त्या विद्यार्थ्याचे नाव घेऊन त्याला प्रश्‍न विचारण्याची संधी दिली जात होती. पहिले दोन प्रश्‍न झाल्यावर सुबोध भावे यांच्या हातात एका विद्यार्थिनीचा प्रश्‍न आला, योगायोग म्हणजे प्रश्‍न विचारणाऱ्या तरुणीचे नाव “ईशा’ होते. त्यामुळे भावे यांनी “ईशा’ नाव प्रेमाने घेताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष सुरू झाला. कारण, टीव्ही सिरियलमधील “तुला पाहते रे..’ ही सुबोध आणि ईशाची मालिका तरुणांच्या मनामनामध्ये बसली आहे. विद्यार्थ्यांनी जल्लोष केला, त्यानंतर सुबोध यांनी त्याचा खुलासा करत, “ईशा’ कुठे आहेस तू…ईशा असे प्रेमाने आवाज देत, ती पहा सापडली असे म्हणत उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.