देहूगाव – देहू नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांची मिळकत कर आणि पाणी आकार असे सुमारे साडेसोळा कोटी रूपये बाकीतील सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये वसुली झाली आहे. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने संबंधित थकबाकीदारांना थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे वसुलीसाठी विविध पर्याय अवलंबण्यात येणार आहे.
निद्रावस्थेचे सोंग घेऊन थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांना जागृत करण्यासाठी त्यांच्या घरांच्या दारात जाऊन ढोल बजावणी राबवण्यात येणार आहे. त्यानंतर भरणा न करणाऱ्यांची नावे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यानंतरही भरणा न करणाऱ्या थकोबाकीदारांची मालमत्ता सील करून जप्त करण्याची कारवाई अवलंबन असणार असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात यांनी दिली.
देहू ग्रामपंचायत असताना तात्कालीन अनेकांच्या थकबाकी असून ही थकबाकी वाढत गेली आहे. यामध्ये अद्यापपर्यंत मिळकत करापोटी 12 कोटी 86 लाख रुपये थकबाकी आहे तर पाणी आकार 3 कोटी 48 लाख रुपये असे एकूण 16 कोटी 34 लाख थकबाकीपैकी पाणीपट्टी 7 लाख,93 हजार तर मिळकत करापोटी 1 कोटी 12 लाख रुपयांची वसुली झाली आहे. नागरिकांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन सूचना करण्यात येत आहे.
पाणी पट्टी आणि मिळकत करा पोटी सुमारे 15 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्याचे नगर पंचायतीपुढे मोठे आव्हान उभे आहे.असे असले तरी ही रक्कम वसूल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून वसूल करणार आहेत. अनधिकृत नळ धारकांची तपासणी करून दंडत्मक वसुली व गुन्हा दाखल करणार असून थकबाकीदादांनी वेळेचं न भरल्यास नळ जोड बंद करण्यात येईल.
पाणी पट्टी व मिळकतकर थकबाकी आकडेवारी
मिळकत कर :
मागील थकबाकी 9 कोटी 15 लाख 92 हजार 966 रुपये ,चालु वर्षाची 3 कोटी 70 लाख 69 हजार 756 रुपये असे एकूण 12 कोटी 86 लाख 62 हजार 722 रुपये .
वसुली रक्कम मिळकत कर थकबाकी रक्कमेतील 1 कोटी 12 लाख रुपये
पाणी पट्टी अद्याप पर्यत 3 कोटी 48 लाख 24 हजार रुपये
वसूल 7 लाख 93 हजार रूपये