IPL 2024 (RR vs CSK Match 61) : चेपॉकमध्ये चेन्नईचे गोलंदाज चमकले, राजस्थानला 141 धावसंख्येवर रोखले

IPL 2024 (RR vs CSK Match 61, Live Cricket Score) : आयपीएल 2024 चा 61 वा सामना चेन्नई आणि राजस्थान यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकात 141 धावा केल्या आहेत. रियान परागने राजस्थानसाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 35 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. या काळात चेन्नईकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने राजस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांना आपले बळी बनवले.
सुपर संडेच्या या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात काही खास नव्हती. जैस्वाल आणि बटलरने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली, परंतु ती अत्यंत संथ गतीने आली, त्यानंतर राजस्थानला डावाच्या शेवटपर्यंत वेगवान धावा करता आल्या नाहीत. संघात उपस्थित असलेले अनेक दिग्गज आणि स्टार फलंदाज पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले.
Innings Break!#RR set a target of 1️⃣4️⃣2️⃣ 🎯
An interesting chase next as #CSK come out to bat soon ⏳
Will #RR defend it to qualify for the Playoffs? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/1JsX9W2grC#TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/XgmXMKCU3C
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
असा होता राजस्थानचा डाव…
राजस्थानकडून प्रथम फलंदाजीला आलेले यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 43 (38 चेंडू) धावांची भागीदारी केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वालने 7व्या षटकात आपली विकेट गमावली. सिमरजीतने जैस्वालला आपला शिकार बनवले. यशस्वीने 21 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. त्यानंतर संथ गतीने खेळत असलेला जोस बटलरही 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सिमरजीतने बटलरलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने 25 चेंडूत केवळ चौकारांसह 21 धावा केल्या.
त्यानंतर कर्णधार संजू आणि रियान पराग यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आणि तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (37 चेंडू) भागीदारी केली. सिमरजीत सिंगने 15 व्या षटकात ही भागीदारी तोडली आणि सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. राजस्थानच्या कर्णधाराने 19 चेंडूत एकही चौकार न लावता केवळ 15 धावा केल्या. त्यानंतर वेगवान धावा काढणाऱ्या ध्रुव जुरेलच्या रूपाने 131 धावांवर राजस्थानने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौथी विकेट गमावली. जुरेलने 18 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभम दुबे खाते न उघडता गोल्डन डकचा बळी ठरला. रियान पराग आणि रविचंद्रन अश्विन अखेरपर्यंत नाबाद परतले. रियानने 47* आणि अश्विनने 1* धावा केली.
चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. चेन्नईसाठी सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी केली आणि राजस्थानला सुरुवातीचे आणि महत्वपूर्ण धक्के दिले, ज्यामुळे त्याच्या इतर फलंदाजांवर दबाव वाढला. यातून राजस्थानचे फलंदाज शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि 150 धावाही करू शकले नाहीत.





