IRE vs PAK 1st T20 : बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट; आयर्लंडकडून प्रथमच पाकचा पराभव…

Ireland vs Pakistan 1st T20 Highlights : तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. यासह आयर्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा पाकिस्तानवर पहिला विजय आहे. आयर्लंडने 2007 नंतर प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यावेळी आयर्लंडने विश्वचषक स्पर्धेत पाकविरूध्द सामना जिंकला होता.
याआधी 2009 मध्ये दोघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानने 39 धावांनी विजय मिळवला होता. शनिवारी डब्लिन येथे झालेल्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक धावा केल्या. डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. सैम अयुबने 45, बाबर आझमने 57 आणि इफ्तिखार अहमदने 37 धावा केल्या. या तिघांशिवाय संघाचा एकही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. आयर्लंडकडून क्रेग यंगने 2 बळी घेतले. गॅरेथ डेलेनी आणि मार्क एडेअरने 1-1 विकेट घेतली.
Ireland win the first T20I by five wickets.#IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/K2x9C2CVKt
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 10, 2024
प्रत्युत्तरात आयर्लंडने 19.5 षटकांत 5 गडी गमावून 183 धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात अँड्र्यू बालबर्नीने 77 धावांची तुफानी खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयर्लंडने 2007 नंतर प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला आहे. आयर्लंडकडून फलंदाजीत अँड्र्यू बालबर्नी आणि हॅरी टेकरने डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली. बलबिर्नीने 55 चेंडूत 77 धावांची खेळी केली.
या पराभवानंतर पाकिस्तान संघ आयसीसी टी-20 क्रमवारीत सातव्या स्थानावर घसरला आहे. यामुळे त्याच्या T20 विश्वचषकाच्या तयारीलाही मोठा धक्का बसला आहे.





