पुणे -कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी मोटार चालकाकडून 8 हजारांची रोकड आणि मोबाईल असा 28 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास औंधमधील परिहार चौकात घडली.
याप्रकरणी विनोद यमगर (वय 33, रा. ओमकार कॉलनी, थेरगाव) यांनी चतुःश्रृंगी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांची स्वतःची मोटार असून भाडेतत्त्वार प्रवाशांची ने-आण करतात. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते परिहार चौकातील यश टायर्ससमोरील रस्त्यावरुन एका प्रवाशाला घेउन चालले होते.
त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी विनोदच्या मोटारीला दुचाकी आडवी लावली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल लांबविला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करीत आहेत.