मुंबई : उद्या शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेच्या वतीने ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी ‘हॉर्न वाजवा आंदोलना’चे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोरोनामुळे राज्यात पाळल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून , रिक्षा, बस, टेम्पो, टॅक्सी, ट्रक वाहतूक व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाचे या व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासनातर्फे त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी मनसे वाहतूक कामगार सेना हे ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन करणार आहेत.
संजय नाईक साहेब (सरचिटणीस – महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ) pic.twitter.com/O47YzUl54R
— sachin jadhav mns(8369595398) (@mns_jadhav) June 9, 2020
या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व चालक आपापल्या वाहनांसोबत तेथील स्टँडवर जमा होतील आणि ‘हॉर्ननाद’ करून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये राज्यातील सर्व वाहतूक संधटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा दावा मनसेच्या वाहतूक शाखेने केला आहे.