देहरादून: उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीचा नेता आयुर्वेदिक डॉक्टर आहे. पोलिसांच्या छाप्यात आरोपींकडून 11 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. डॉक्टर बापाने 2 मुलांच्या शैक्षणिक फी भरण्यासाठी नोटा छापल्याचे समोर आले आहे
देहरादूनचे पोलिस अधीक्षक (शहर) श्वेता चौबे यांनी गुरुवारी हि माहिती आयएएनएसला फोनद्वारे दिली. त्यांनी सांगितले, “बनावट नोटा छापणार्या या टोळीचे दोन मास्टमाइंड विक्रम चौहान आणि राजेश गौतम यांना 17 सप्टेंबर 2019 रोजी अटक केली गेली होती. त्यावेळी आयुर्वेदिक डॉक्टर संजय शर्मा फरार झाले होते. पोलिसांनी सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे भारतीय बनावट चलन, चार छपाईची काडतुसे, 16 पानांची छपाई, एक पिस्तूल जप्त केले.”
एसपी श्वेता चौबे यांच्या म्हणण्यानुसार, “आरोपी संजय शर्मा कडून 11 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शर्मा पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. बर्याच काळापासून त्याचे क्लिनिक व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. घरातील खर्च वाढतच होता. त्यामुळे बनावट नोटा छापून घर खर्च चालवण्याचा विचार त्याने केला. तसेच मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा भार त्याच्यावर असल्याचे समोर आले आहे.