नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या पदरी निराशा
नगर – जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली असली तरीही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाने बॅंकेच्या प्रारुप मतदार संदर्भातला कार्यक्रम घोषित केला आहे. याबाबतचे आदेश प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आलेली आहे. आज राज्य सहकार निवडणूक प्राधिकारणाने मतदार यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. बॅंकेसाठी मतदार यादी अंतिम करण्याचा सुधारित कार्यक्रम खालीलप्रमाणे राहिल. दि.13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी सभासद संस्थेचे ठराव मागविण्याची अंतिम तारीख, दि.20 फेब्रुवारी रोजी प्राप्त संस्था प्रतिनिधीचे ठराव बॅंकेस देणे.
तसेच दि.26 फेब्रुवारी बॅंकेने प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर करण्याची तारीख, दि.6 मार्च रोजी प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी यांना सादर करण्याची अंतिम तारीख, दि.6 मार्च सकाळी 11 वाजता प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्द करण्याची तारीख, दि.16 मार्च प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे प्रारुप मतदार यादीवर आक्षेप सादर करण्याची अंतिम तारीख,
दि.26 मार्च रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना प्राप्त आक्षेपांवर निर्णय देण्याची अंतिम तारीख, दि.30 मार्च अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख राहणार आहे