थायलंडचे राजे महा वजीरालॉन्गकॉर्न यांचा राज्याभिषेक

बॅंकॉक – थायलंडचे राजे महा वजीरालॉन्गकॉर्न यांचा आज थाटामाटाने राज्याभिषेक करण्यात आला. हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही पारंपारिक धार्मिक विधींनी राजांचा राज्याभिषेक झाला. यादरम्यान एक भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
राजा वजीरालॉन्गकॉर्न यांना तीन राण्यांपासून पाच मुले आणि दोन मुली आहेत. राजेशाही रितीरिवाजानुसार काढण्यात आलेल्या निवेदनामधून त्यांच्या शाही लग्नाची घोषणा झाली. बुधवारी झालेल्या या शाही लग्नाच्या विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आल्या.

वजीरालॉन्गकॉर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे वडील राजा भूमिबोल अडुलयादेज यांचे 13 ऑक्‍टोबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर ऑक्‍टोबर 2016 मध्येच देशाच्या संसदेने मांडलेला राजा बनण्याचा प्रस्ताव माहा वाजीरालॉन्गकॉर्न यांनी स्वीकारला. त्यामुळे आता वजीरालॉन्गकॉर्न कायदेशीररित्या सिंहासनावर विराजमान झाले. त्याचे वडील 70 वर्ष सिंहासनाधीश होते.


राज्याभिषेकापूर्वीच विवाहबद्ध…
राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी थायलंडचे राजे माहा वजीरालॉन्गकॉर्न यांनी सगळ्यांना धक्का देत आपल्या सुरक्षा पथकाच्या कमांडरसोबत लग्न केले आणि त्यांना राणी सुथिदा अशी उपाधीही दिली. 44 वर्षीय सुथिदा यांचं पूर्ण नाव सुथिदा तिदजई असून त्या थाय एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडंट होत्या. 2014 मध्ये वजीरालॉन्गकॉर्न यांनी सुथिदा यांना आपल्या बॉडीगार्ड पथकाचे डेप्युटी कमांडर बनवले होते. यानंतर डिसेंबर 2016 मध्ये सुथिदा यांना पूर्ण सेनापती बनवण्यात आले आणि 2017 मध्ये थानपयिंगही बनवले, जे एक शाही पद असून त्याचा अर्थ लेडी असा आहे. खरंतर राणी सुथिदा अनेक वर्षांपासून राजासोबत पाहायला मिळत होत्या. पण त्याच्या नात्याबाबत अधिकृतरित्या काहीही समोर आलेले नव्हते. 66 वर्षीय राजे वजीरालॉन्गकॉर्न यांचे हे चौथे लग्न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.