मुंबईत नोकरीच्या बहाण्याने चुना

चौघांकडून प्रत्येकी  60 हजार रुपये घेत घातला गंडा
महिनाभराच्या ओळखीवर केला अडीच लाख रुपयांचा व्यवहार

पुणे –
मुंबईतील एका महाविद्यालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने चौघांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेला तक्रारदार मूळचा मुंबईचा असून त्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेश कदम (रा. कोयना वसाहत, गोरेगाव, मुंबई) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मधुकर दादू साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांची महिनाभरापूर्वी साळवे बरोबर ओळख झाली होती.

त्यावेळी साळवेने कदम यांना मुंबईतील एका प्रसिद्ध महाविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. कदम पुण्यात मागील महिन्यात आले आणि साळवे याची भांडारकर रस्त्यावर भेट घेतली. त्यावेळी कदम यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईकांना महाविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष साळवे याने दाखविले. त्यांच्याकडून प्रत्येकी साठ हजार रुपये असे एकुण मिळून 2 लाख 40 हजार रुपये साळवेने घेतले. त्यानंतर कदम यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. साळवेचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नुकताच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. मेटे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.