बँकॉक – म्यानमारच्या पूर्व भागातून सुमारे १,३०० लोकांनी थायलंडमध्ये पलायन केले आहे. सीमा भागातील बंडखोरांकडून नव्याने संघर्ष सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात करेन वंशाच्या अल्पसंख्यकांनी लष्कराची ठाणी ताब्यात घेतली होती. थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या म्यावाड्डी प्रांतातील ही ठाणी बंडखोरांनी ताब्यात घेतली होती. (About 1,300 people from Myanmar flee into Thailand after clashes broke out in a key border town )
या प्रांतातील मोई नदीवरच्या दोन पूलांनी म्यानमार थायलंडला जोडला जातो. त्यामुळे या लोकांना या मार्गांनी थायलंडमध्ये पलायन केले. म्यावाड्डीच्या अनेक भागात झालेल्या संघर्षानंतर लोकांनी शुक्रवारपासून सीमा ओलांडणे सुरू केले आहे, असे थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२१ मध्ये आँग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत करणाऱ्या लष्करासाठी म्यावाड्डीचा पतन हा मोठा धक्का आहे. म्यानमारच्या एकेकाळच्या पराक्रमी सशस्त्र दलांना गेल्या ऑक्टोबरपासून अनेक अभूतपूर्व पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अनेक दशके मोठ्या स्वायत्ततेसाठी लढा देणाऱ्या दोन्ही जातीय लढवय्ये आणि लोकशाही समर्थक गनिमी तुकड्यांनी म्यानमारच्या लष्कराकडून सीमावर्ती चौक्यांसह शस्त्रे हाती घेतली आहेत. करेन बंडखोरांनी लष्करावर ड्रोन आणि हवाई हल्ले देखील केले आहेत. काही भागांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरू आहे.
थायलंडच्या सीमाभागात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. थायलंडच्या सुरक्षा दलांकडून म्यानमारच्या नागरिकांची ओळख पटवून त्यांना हद्दीमध्ये प्रवेश दिला जातो आहे. या घटनाक्रमाकडेबारकाईने बघितले जात असल्याचे थायलंडचे पंतप्रधान श्रेष्ठ थाविसीन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मार्चमध्ये, थायलंडने सुमारे २० हजार विस्थापित लोकांसाठी मानवतावादी मदतीची पहिली खेप म्यानमारला दिली. ही मानवतावादी मदत वाढवण्यात येणार असल्याचे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.