पुणे – दि को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेच्या अध्यक्षपदी ऍड. अभय अजनाडकर यांची एकमताने फेरनिवड झाली आहे. याबरोबरच उपाध्यक्ष पदी ऍड. माधव सोमण, सेकेटरी पदी ऍड. जे. व्ही. खुर्जेकर, जॉइंट सेक्रेटरी पदी ऍड. अद्वैत भणगे, खजिनदार म्हणून ऍड. मिलिद डहाके यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स म्हणून ऍड. अश्विनी हसबनीस, ऍड. संजय काकडे, ऍड विकम दौंडकर, ऍड. निरेश भरते, ऍड. प्रणव खडीवाले व ऍड. जान्हवी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. कमिटीची मुदत एक वर्षाची आहे.
ही संस्था सहकार क्षेत्रात काम करण्याऱ्या वकिलांची आहे. येत्या वर्षभरात वकिलांच्या उत्कर्षासाठी व तसेच ज्ञान वृध्दीसाठी नामांकित व जेष्ठ वकिलांची व्याख्याने, चर्चासत्रे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.