पुणे – खडकवासला येथील सांगरुन गावाच्या हद्दीतील मुठा नदी पात्रात एका व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात निखील उर्फ सोन्या चोरे (वय 21, रा. शिरूर ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यय यांनी जामीन मंजूर केला. त्याने ऍड अभिषेक हरगणे आणि ऍड ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
चोरे सह एकूण 5 आरोपी विरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे आणि संगणमताच्या कलमानुसार उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे ऑक्टोबर 2022 मध्ये गुन्हा दाखल आहे. खून करून त्या व्यक्तीचा मृतदेह ट्रॉलीमध्ये भरून सांगरून गावाच्या हद्दीत एका चारी मध्ये फेकल्याचे नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात चोरे याने बचाव पक्षातर्फे जामिनासाठी अर्ज केला होता. पुरेसा पुरवा नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने केला.