अहमदाबाद: अहमदाबाद मधील पोर्श 911 स्पोर्ट्स कारच्या मालकाला आपली कार परत घेण्यासाठी 27.68 लाख रुपये द्यावे लागले. गाडीचे कागदपत्रे नसल्यामुळे अहमदाबाद पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले होते. त्यानंतर कारच्या मालकाने थकित कर, व्याज आणि दंड यासह ही रक्कम भरली. मंगळवारी रणजित देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्कम जमा केल्यानंतर त्यांची जप्त केलेली गाडी वाहतूक पोलिसांकडून परत घेतली.
RTO @cotguj slaps a fine of total INR 27.68 Lakh on Porsche Car which was detained during a routine check by Ahmedabad Traffic West Police for not having required documents. One of the highest fine amount levied in the country ever. #GujaratRTO #AhmedabadPolice pic.twitter.com/xPY14vdUmW
— Ahmedabad Police (@AhmedabadPolice) January 8, 2020
नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली होती. यानंतर अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आरटीओ पावतीचे छायाचित्र ट्वीट केले आहे. 27.68 लाख रुपये हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दंड असल्याचे पोलिसांचा दावा आहे. बुधवारी पोलिसांनी ट्वीट केले की, “आरटीओने पोर्श कारवर 27.68 लाखांचा दंड ठोठावला आहे. कागदाअभावी पोलिसांनी ते ताब्यात घेतले. आजपर्यंत देशात कोणाकडूनही एवढा दंड घेण्यात आलेला नाही.”
28 नोव्हेंबर रोजी वाहनावर नंबर प्लेट नसल्यामुळे वाहन थांबविण्यात आले. यानंतर हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात, कारचालकाला जेंव्हा कागदपत्रे मागितले, तेव्हा त्याच्याकडे सर्व कागदपत्रे नव्हती. त्यानंतर पोलिसांनी वाहन घेऊन मोटार वाहन कायद्यांतर्गत निवेदन दिले.
यापूर्वी 9.8 लाख रुपये दंड वसूल केला गेला होता, परंतु आरटीओने जुन्या नोंदींची छानबीन केली तेव्हा हा दंड 27.68 लाख रुपये आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.
— Ahmedabad Police (@AhmedabadPolice) January 8, 2020