इंदूर : भारताविरूध्दच्या तिस-या व अंतिम टी-२० क्रिकेट सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.दुखापतीमुळे श्रीलंकेचा डावखुरा गोलंदाज इसुरू उदना हा अंतिम टी-२० क्रिकेट सामन्याला मुकणार आहे.
#SriLanka's Isuru Udana will not play in the third #INDvSL T20 match. https://t.co/OHIc6ZnF6D
— Island Cricket (@IslandCricket) January 8, 2020
सरावादरम्यान त्याची पाठ दुखावली असल्याचे श्रीलंकेचे प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितले. तसेच पहिल्या सामन्यादरम्यान गोलंदाजीपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करू शकला नव्हता.
मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना १० जानेवारीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. गुरूवारी दुस-या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ विकेटनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून भारताचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे तर अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल. मागील दहा वर्षात भारताविरूध्द तिन्ही क्रिकेट प्रकारात दोन संघाची मालिका जिंकण्यात श्रीलंका संघाला अपयश आले आहे.