शिरूर (प्रतिनिधी): शिरूर शहरात कुंभार आळी परिसरात जवळपास 35 कुंभार समाजाची कुटुंबे असून त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या पारंपारिक मातीच्या वस्तू बनवून त्यांची विक्री करण्यात असतो सध्या उन्हाळा महिना चालू असून गरिबांचा फ्रीज म्हणून यांचे मातीचे मडके,मटका, रांजण हा धंदा तेजीत असतो.
या उन्हाळ्याच्या धंद्यावर कुंभार समाजाचे संपूर्ण वार्षिक गणिते अवलंबून असते. परंतु कोरोनाव्हायरस आणि लॉक डाऊन यामुळे यंदाच्या वर्षी मात्र लाखो रुपयांचा माल येथील कुंभार समाजाच्या घरी पडून असून, या कुंभार समाजासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक उदात्तीकरण यासाठी योजना अमलात आणावी अशी मागणी समाजाकडून होत आहे.
आता येणाऱ्या अक्षय तृतीया ला ही मोठ्या प्रमाणात झाडांची विक्री होती परंतु लॉक डाऊन मुळे या विक्री वरही मोठा परिणाम होईल मोठे आर्थिक तोटा कुंभार समाजाला होणार आहे.