पुणे – शहरात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, मोठी हानी झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने जेजुरी- सासवड मार्गवरील पूल देखील तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.