नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरूवारी राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. अरूण जेटली आणि राम जेठमलानी या माजी केंद्रीय मंत्र्यांच्या निधनामुळे त्या जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होईल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते जेटली यांचे 24 ऑगस्टला निधन झाले. ते उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत एप्रिल 2024 मध्ये समाप्त होणार होती. वरिष्ठ वकील जेठमलानी यांचे 9 सप्टेंबरला निधन झाले. ते राजदचे उमेदवार म्हणून बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ जुलै 2022 मध्ये समाप्त होणार होता.