नवी दिल्ली : मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात तपासात सहकार्य देत नसल्याचा आरोप करून ईडीने प्रियंका गांधी यांचे पती राबर्ट वड्रा यांना कोठडीत ठेवण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायलयाने केली.
वड्रा हे मनी लॉंडरिंगगच्या साखळीशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्या सखोल चौकशीची नितांत आवश्यकता असल्याचे ईडीने न्यायलयाला सांगितले. इडीच्या या दाव्या वड्रा यांच्या वकीलांनी विरोध केला. आपल्या आशिलाला जेव्हा बोलावले जाते तेव्हा त्यांनी हजर राहून तपासात सहकार्य केले आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यात त्यांनी केवळ आरोप नाकबूल केले आहेत. याचा अर्थ ते सहकार्य करीत नाहीत, असा होत नाही, असे वड्रा यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने 5 नोव्हेंबर रोजी अंतिम सूनावणी घेण्याचे निश्चित केले.