मुंबई – वयचोरीचे आरोप झालेल्या राजवर्धन हंगरगेकरबात लवकरच तपास करणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. भारताच्या 19 वर्षांखालील संघातून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या हंगरगेकरने खरे वय 21 असतानाही खोटेपणा करून वयचोरी केल्याची तक्रार महाराष्ट्रच्या क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे केली होती.
वेस्ट इंडीजमध्ये नुकत्याच झालेल्या 19 वपर्षांखालील विस्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाकडून राजवर्धन खेळला होता. ताशी 145 किलोमिटर वेगाने गोलंदाजी करुन तो कौतुकाचा विषय बनला होता. मात्र, त्याचे वय 21 असून त्याबाबतची सर्व पुरावे व कागदपत्रे बकोरिया यांनी बीसीसीआयला पाठवली होती.
बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाईही केली जाणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.