मुंबई – ‘शांतीत क्रांती’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ललित प्रभाकर, (Lalit Prabhakar)आलोक राजवाजे, (Alok Rajwaje) अभय महाजन (Abhay Mahajan) आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार शांतीत क्रांतीमध्ये पाहायला मिळाले होते. या कलाकरांच्या अभिनयाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले होते. मात्र आता ‘शांतीत क्रांती’ चा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकताच याचा दमदार ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे.
‘शांतीत क्रांती सीझन 2’ या वेबसीरिजमध्ये ललित प्रभाकरने प्रसन्न ही भूमिका साकारली आहे. तर दिनार ही भूमिका अलोक राजवडेनं साकारली आहे. तसेच या वेब सीरिजमधील श्रेयस ही भूमिका अभय महाजन यानं साकारली आहे. या तिघांची फूल टू धमाल पुन्हा एकदा या वेबसिरीजच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
ललित प्रभाकरने शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, ‘मंडळी तुमचे आवडते त्रिकुट परत येतंय तुमच्या भेटीला आणि ते पण डब्बल मज्जा आणि मस्ती सकट. आता हा प्रवास होणार आहे अजून धमाकेदार. तर तयार रहा एक कडक प्रवासासाठी!’
View this post on Instagram
‘शांतीत क्रांती 2 ही वेब सीरिज 13 ऑक्टोबरपासून सोनी लिव्ह या अॅपवर पाहता येणार आहे. भडिपासह सहयोगाने टीव्हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शांतीत क्रांती सीझन 2 चे दिग्दर्शन सारंग साठ्ये आणि पौला मॅकग्लीन यांनी केले आहे.