entertainment – नवीन 2024 या वर्षांमध्ये केवळ क्रीडा आणि राजकीय या दोन क्षेत्रांच्या व्यासपीठावरच नवनवीन घडामोडी घडणार आहेत असे नाही तर मनोरंजन क्षेत्रामध्येही विविध प्रकारच्या मनोरंजनाचा पेटारा उघडला जाणार आहे जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी असलेल्या भारतामध्ये अनेक महत्वाकांक्षी चित्रपट या वर्षांमध्ये रिलीज होणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही वेब सिरीजची अनोखी मेजवानी चाखायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा फायटर विजय सेतुपतीचा कतरीना कैफचा मेरी ख्रिसमस आणि प्रभासचा कलकी हे महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित केले जातील या सर्वच चित्रपटांची गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची विशेष भूमिका असलेला लाल सलाम हा चित्रपटही जानेवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे मराठी चित्रपटाचा विचार करता प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने यांनी निर्माण केलेला मराठी चित्रपट पंचक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल या व्यतिरिक्त श्रीदेवी प्रसन्न हा वेगळ्या धाटणीचा चित्रपटही प्रदर्शित होईल.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित सत्यशोधक हा चित्रपटही यावर्षीचे आकर्षण ठरणार आहे ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे कार्यक्रम बघण्याची आवड असणाऱ्या चाहत्यांसाठी मात्र हे वर्ष विशेष आकर्षणाचे ठरणार आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेल्या वेबसाईटचे पुढील भाग याच वर्षांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सिरीज फॅमिली मॅनचा तिसरा पार्ट यावर्षी प्रदर्शित होईल गेल्या काही कालावधीमध्ये विविध भुमिकांमुळे गाजलेल्या बॉबी देवलच्या आश्रम या वादग्रस्त पण प्रख्यात वेब सिरीजचा चौथा पार्टही यावर्षी प्रदर्शित होईल फरझी या वेब सिरीजच्या निमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मचा अनुभव घेणाऱ्या शाहिद कपूरच्या या सिरीजचा पुढचा भागही ह्याच वर्षी प्रसिद्ध होणार आहे.
या व्यतिरिक्त काला पानी पाताळ लोक या गेल्या वर्षी गाजलेल्या वेब सिरीजचे पुढील भागही प्रदर्शित होतील ओटोटीप्लॅटफॉर्म वरील सर्वात लोकप्रिय वेबसिरीज मानल्या गेलेल्या मिर्झापूर या वेबसाईटचा तिसरा भागही दीर्घकाळ प्रदर्शनासाठी रखडला आहे तो सुद्धा याच वर्षी प्रदर्शित होणार आहे साहजिकच हे नवीन वर्ष म्हणजे चित्रपट आणि वेब सिरीजच्या चाहत्यांसाठी एक अनोखी मेजवानी ठरणार आहे.