shahid kapoor – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) आणि विजय सेतुपती यांनी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या निर्मिती ‘फर्जी’ (farzi) मधून डिजिटल पदार्पण केले आहे.
यांसोबत मालिकेत प्रतिभावान अभिनेते के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली होती.
ही सिरीज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर हिट झाली आहे. यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि यूएईमधील टॉप 10 च्या यादीत ‘फर्जी’च (farzi) नाव आहे. याची माहिती खुद्द शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी दिली होती.
दरम्यान, ‘फर्जीच्या’ चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूरला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत प्रश्न विचारण्यात आला. या शाहिदनं दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
यावेळी बोलताना शाहिद म्हणाला, ‘फर्जी वेब सीरिजचा दुसरा सीझन नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. पण त्याला थोडा वेळ लागले. आगामी सीजन मध्ये आणखी नवीन गोष्टींचा उलगडा होताना दिसणार आहे’. असं देखील यावेळी अभिनेता म्हणाला.