mirzapur । अलीकडे, OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने या वर्षी अनेक आगामी चित्रपट आणि मालिका जाहीर केल्या आहे. यात ‘मिर्झापूर ३’ चे नावही आहे.
या घोषणेनंतर मुन्ना भैय्या ( अभिनेता दिव्येंदू शर्मा) चे चाहते या सीझनमध्ये तो दिसणार की नाही यावर प्रश्न विचारत आहे. कारण चर्चा अशी आहे की, ‘मिर्झापूर २’ मध्ये मुन्ना भैय्या हे पात्र दिसणार नाही. यावरून आता चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहे.
वृत्त वहिनीला दिव्येंदूच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की अभिनेता सीझन 3 मध्ये दिसणार नाही. दिव्येंदू शर्मा जरी एक्सेल एंटरटेनमेंटच्या ‘मिर्झापूर 3’ चा भाग नसला तरी तो त्यांच्या ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटात नक्कीच दिसणार आहे. दिव्येंदू या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये न येणे हा केवळ एक सर्जनशील निर्णय आहे.
‘मिर्झापूर 3’चे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिव्येंदू शर्माने या सीझनसाठी शूट केले नसले तरी तो या मालिकेत परत येऊ शकत नाही, असे नाही. या सीझनला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आणि ‘मुन्ना भैय्या’बद्दलची त्यांची प्रतिक्रिया पाहून प्रोडक्शन हाऊस सीझन 4 मधील ‘मुन्ना भैय्या’च्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकते.
दिव्येंदूच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, तो सध्या त्याच्या व्यावसायिक जीवनात खूप व्यस्त आहे आणि त्याचा ‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट 22 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होत आहे.
हे वाचाल का ? मराठा समाजातील तरुणांनी विचारला प्रश्न,’नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे ? बैठक न घेताच नेत्यानं सोडलं ‘गाव’