नवी दिल्ली – आपल्या दैनंदिन व्यहारामध्ये अनेकदा आपल्या फाटलेल्या नोटा येतेय असतात. पण ह्या फाटलेल्या नोटा घेणयासाठी अनेक जण टाळाटाळ करतात.
मात्र, आता यापुढे अशा नोटा बदल्याण्यासाठी कोणाला विनंती करायची गरज भासणार नाही. कारण ‘नोट रिफंड २०१८’च्या नियमांतर्गत बँक तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देणार आहे.
दरम्यान, यापुढे फाटलेली नोट बदलायची असल्यास कोणत्याही बँकमध्ये बदलून दिली जाऊ शकते. कारण नोट बदलण्यासाठी बँक कर्मचारी नकार देऊ शकत नाही. सर्व बँकांना अशाप्रकारच्या आदेश भारतीय रिझर्व्ह बँकने दिले आहेत.
त्यामुळे आता बँक तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत फाटलेली नोट बदलून देऊ शकते. तसेच, नोटा बदलण्यास बँक नकार देत असले तर त्यांची तक्रार बँकिंग लोकपाल किंवा रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर करता येऊ शकते.
नियमानुसार, ५० रुपयांपेक्षा खाली आणि त्यावर असलेल्या नोटांसाठी रिफंडचे वेग-वेगळे नियम आहेत. ५० रुपयापेक्षा अधिक किंमत असलेल्या नोटा बदलायच्या असल्यास आणि नोटेचा ८० टक्के भाग चांगला असल्यास बँक पूर्ण रिफंड देते.
फाटलेल्या नोटेचा ४० टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल. तसेच जर नोटेचा ४० टक्क्यांहून छोटा भाग असल्यास त्याचे रिफंड मिळणार नाही.