विहिरी मध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

पेठ – आज पेठपासून दोन ते अडीच किमी असलेल्या वलखेडवस्ती येथील आनंद ढाब्याच्या पश्चिमेला अंदाजे 500 ते 600 मी.लांब असलेल्या विहिरी मध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही विहीर अशोक शंकर थोरात यांच्या मालकीची होती.

दरम्यान, हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून बारा ते पंधरा दिवसांपासून विहिरीत असण्याची शक्यता आहे. सदर विहीर ही अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे आणि मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वर काढण्यास अडचण येत आहे.

पेठचे पोलिस पाटील सविता माठे यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती मंचर पोलिसांना कळविली. त्यानंतर त्वरित मंचर पोलीस एपीआय लाडसाहेब, पोलिस कर्मचारी सुनील शिंदे, कैलास कड ,दिनेश माताडे, निलेश खैरे आदी घटनास्थळी दाखल झाले.

गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह वर काढण्यासाठी प्रयत्न करत असून घटनेचा पुढील तपास अद्याप ही सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.