पराग पतसंस्थेला 1.10 कोटी नफा
मंचर – सहकारी संस्थांचा हेतू तळगाळतील शेतकरी बांधवांना तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक यांची आर्थिक गरज भागवणे हा असतो, असे प्रतिपादन पराग नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक देवेंद्र शहा यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील पराग नागरी सहकारी पतसंस्थेची 6 वी वार्षिक सर्वसाधारण अवसरी फाटा येथे पार पडली, यावेळी शहा बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बांगर यांनी संस्था प्रगतीपथावर असून, संस्थेला अहवालसाली निव्वळ नफा 1.10 कोटी झालेला असल्याचे सांगितले.
संस्थेसाठी स्वमालकीचे नवीन कार्यलय खरेदी करीत असल्याबाबत सभेची मंजुरी घेतली असून, संस्थेने शून्य टक्के एनपीएची परंपरा कायम राखत सभासद कर्जदार यांचे मनस्वी आभार मानले. संस्था माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच देवेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेत आहे.
पतसंस्थेचे भाग भांडवल 1 कोटी 57 लाख 24 हजार आहे. स्वनिधी 6 कोटी 60 लाख 19 हजार आहे. ठेवी 24 कोटी 40 लाख 89 हजार आहे. कर्जे 21 कोटी 52 लाख 44 हजार आहे. गुंतवणूक 10 कोटी 36 लाख 68 हजार आहे. एनपीए शून्य टक्के असून संस्थेचा सीआरएआर रेशो 40.40 टक्के आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी यांनी दिली. यावेळी शरद सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना काकडे, हिरामन ढोरे, कायदेशीर सल्लागार नीलेश शेळके, नवनाथ निघोट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक आणि सभासद उपस्थित होते.